top of page
Care.jpg

डॉक्टरांना भेटण्यापूर्वी: 

मानसोपचारतज्ञांना भेटण्यापूर्वी रुग्ण, clients, किंवा त्यांचे नातेवाईक यांच्या मनात चिंता, शंका, काळजी, व थोडी भीती असणे स्वाभाविक आहे. या सर्व शंकांचे पूर्ण निरसन व्हावे, यासाठी डॉक्टरांना पहिल्यांदा भेटण्यापूर्वी काही काळजी घेणे योग्य ठरते. 

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn
  • Instagram
  • डॉक्टरांना पहिल्यांदा भेटताना आपली समस्या, किंवा आजार याची पूर्ण माहिती डॉक्टरांना द्या. काही माहिती देताना संकोच वाटणे स्वाभाविक आहे. तुम्ही डॉक्टरांना दिलेली आजारासंबंधीची सर्व माहिती ही confidentiality (गुप्तता) कराराने बांधलेली असते. त्यामुळे नि:संकोच पणे डॉक्टरांसोबत चर्चा करा. 

  • अनेकदा, काही लक्षणे छुपी असतात, जी आपल्या स्वत:च्या लक्षात येत नाहीत (जसे झोपेसंबंधीची लक्षणे), मात्र घरातील इतर व्यक्तीच्या ध्यानात येतात. त्यामुळे जर शक्य असेल, तर रुग्ण/client सोबत जी व्यक्ती राहते, किंवा ज्याला/जिला समस्येबाबत सर्व माहिती आहे,  अशी व्यक्ती सोबत येणे ही खूप मोठी मदत ठरते. त्यांच्याकडून मिळालेली अधिकची माहिती समस्येचा पूर्ण अंदाज येण्यास हातभार लावते. 

 

  • बर्याच वेळेस, इतर काही शारिरीक आजार किंवा समस्येसाठी उपचार, किंवा काही उपाय सुरु असतात. ते लपवू नका. जर शक्य असेल, तर त्या उपचारांचे कागद सोबत आणा व दाखवा. सगळे कागद व रेकॉर्ड आणणे बर्याच वेळेस शक्य होत नाही, अशा वेळेस, एका कागदावर संक्षिप्त स्वरुपात: समस्या, निदान, सध्या सुरु असलेली औषधे, काही allergy असल्यास त्याची माहिती ही माहिती द्यावी. 

 

  • समस्या किंवा आजार यांचे स्वरुप जर गुंतागुंतीचे असेल, किंवा काही महत्वाचे मुद्दे चर्चा करायचे असतील, तर त्याची नोंद तुमच्या सोबत ठेवा. अनेकदा, चर्चा करताना एखादा मुद्दा विसरला जातो, व शंकांचे पूर्ण निरसन होत नाही. 

सारांश: 

मानसोपचारतज्ञांशी मोकळेपणाने बोला. तुमच्या कडची माहिती व शंका नीट व नि:संकोचपणे विचारा, पूर्ण माहिती देऊन समस्या समजून घेण्यास सहकार्य करा. 

Contact

Dhanvantari Nursing Home Neuropsychiatry Centre

331, E, Off Wilder Memorial Church, New Shahupuri.

Kolhapur. 416001

Ph: +91-9167577279

bottom of page