top of page
Search
  • Writer's pictureDevavrat Harshe

Looking for ways to quit tobacco addiction? तंबाखूविरोधी दिनाच्या निमित्ताने:

Updated: Jun 20


तंबाखू काही भारताला नवीन नाही. जगातले जवळ जवळ १० ते १२ टक्के तंबाखू खाणारे लोक भारतात राहतात.या सगळ्यांमध्ये, समाजाच्या सर्व स्तरांमधील, सर्व जाती धर्माचे, सर्व व्यवसायामधील लोक (“डॉक्टर तुम्ही सुद्धा!” असं म्हणायला लावणारे डॉक्टर देखील) आहेत. असं असताना, जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा का करावा लागतो हे जाणणं गरजेचं आहे. 


तंबाखू ने कॅन्सर होतो हे आता एक सर्वमान्य सत्य आहें. ते नुसतं वाचून पुरे पडणार नाही म्हणून की काय, सिनेमा सुरु होताना डोळ्यावर आघात करणारी जाहिरात दाखवली जाते. तंबाखू ने होणारे कॅन्सर, तोड़ व घशामधील जखमा, तंबाखूने तोंड, नखं, दात यांवर केलेलं रंगकाम हे सगळं सगळ्यांना माहिती असून देखील लोक तंबाखू का खातात हा प्रश्न कुणालाही पडू शकतो. तर याचं उत्तर असं, की तंबाखू सोडणं हे महाकठींण काम आहे. 


मुळात तंबाखू चं व्यसन का लागतं?

मुळात, तंबाखू हा एक मनोकार्यिक पदार्थ (psychoactive) आहे, म्हणजेच, शरीरातील इतर अवयव यांवर तर तो परिणाम करतोच, पण मनावर देखील परिणाम करतो. एक मिसळ किंवा पिझ्झा खाणे, व एक तंबाखूचा बार

Effects of addiction on the brain
Brain on drugs

भरणे, या दोन्ही गोष्टींमुळे मनाला आनंद मिळतो, पण तंबाखूच्या बारामुळे मिळणारा आनंद हा कैच्या कै पटीने जास्त असतो, ज्याला सर्वसामान्य भाषेत “किक” म्हणतात. हा मेंदूला मिळालेला आनंद देखील जाता जाता मेंदूला सणसणीत लाथ हाणून जात असतो, कारण मिसळीमुळे झालेला आनंद हळूहळू वाढतो, व कमी होतों, मात्र तंबाखू, दारु, अशा पदार्थांमुळे मिळणारा आनंद हा फ़ार पटकन सुरु होतों, चटकन वाढतो व काही क्षणांत नष्ट होतों.  यामुळे होतं असं, की असा आनंद मिळवण्याची मेंदूला चटक लागते. हे अगदीच नैसर्गिक आहे. पटकन मिळणारी प्रसिद्धी, यश, पैसा हे जसं प्रत्येकाला हवं असतं, तसंच मेंदूलाही असा क्षणात मिळणारा आनंद हवाच असतो!


हळुहळू मग असा क्षणिक आनंद मिळवण्यासाठी मेंदू सुरुवातीला विनंती करतो, आनि एकदा का त्या बिचार्या माणसाने मेंदूचा हट्ट पुरवायला सुरुवात केली, की मेंदू त्याला आपल्या ताब्यात घेतो. मग जेव्हा जेव्हा आनंदाची इच्छा होईल, तेव्हा मेंदू बेचैन करून सोडतो, डोकेदुखी पासून, तल्लफ, अकार्यक्षमता, ध्यानधारणेचा अभाव, बेचैनी, झोप कमी होणे, अशा अनेक लक्षणांनी हैराण करतो (craving), व शेवटी त्याचा हट्ट हा पुरवावाच लागतो. एकदा पुरवला, की तुमच्याच मेंदूला तुमची किल्ली सापडते. इच्छा झाली, की तो ती पिळतो व त्यावर टाळ्या वाजवणार्या विदुषकाप्रमाणे तुम्हाला तंबाखूचा बार भरावाच लागतों. पुढे पुढे ही भूक वाढते. किक मिळवण्यासाठी जास्त तंबाखू खावी लागतें (tolerence). खाणारा मात्र मस्त असतो, बर्याच वेळा मिशीला किंवा आयब्रोला तूप लावून सांगत असतो/ते, की माझी कपॅसिटी वाढलीये, पूर्वी मी जेमतेम १ सिगरेट ओढू शकायचो, आता अगदी सहज ५ सिगरेट ओढू शकतो, मला काहीच होत नाही. वास्तविक हा पहिला धोक्याचा इशारा आहे, की परिस्थिती already तुमच्या हातातून बाहेर गेलेली आहें. 


Cycle of addiction and detox
Tobacco Addiction

खरुजेसारखी ही हाव हळुहळु वाढत जाते. काही काही वेळेस माणसं जिद्दीने तिच्याशी लढायचा प्रयत्न करतात. अनेकदा, जवळच्या माणसांची साथ, मदत याने काही प्रमाणात तंबाखूपासून लांब जायचा प्रयत्न करतो देखील!

मग मेंदू एक नवंच हत्यार काढतो, उतार्याच (withdrawal). कोणतंही व्यसन सोडण्याचा प्रयत्न करणार्या माणसाची खरी समस्या हीच तर असते. आजूबाजूचे, घरातले सगळे त्याला किंवा तिला “त्यात काय अवघड आहें”? किंवा “तुलाच सोडायचं नसेंल” असं म्हणत राहतात. पण withdrawal ची लक्षणं काय असतात हे प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कळणं अशक्य आहे. चहा किंवा कॉफी पिणारे, ठरलेल्या वेळेस चहा मिळाला नाही तर कासावीस होतात, हे withdrawal चंच कर्तृत्व असतं. व्यसन करणारा किंवा करणारी, या withdrawal च्या भीतीच्या छायेतच जगत असतात, सोडण्याचे किती तरी प्रयत्न हे withdrawal च्या भिंतीवर आपटून अपयशी ठरत असतात. तो बिचारा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असतो, पण craving, withdrawal व tolerance मिळून याला खाली ओढत असतात, मित्र, नातेवाईक त्याला इच्छाशक्ती नसलेला, वीक माइंडेड म्हणून अजूनच गर्तेत ढकलत असतात. अनेकदा असं लक्षात येतं, की आत्यंतिक मानसिक तणाव असणारी, किंवा मानसिक आजार असणारी व्यक्ती व्यसनाच्या आहारी पटकन जाते, किंवा, त्या ताण किंवा आजारामुळे व्यसनाची तीव्रता वाढत जाते. कसं बाहेर पडायचं मग या सापळ्यातून? (What are ways to quit tobacco addiction?)

हे सगळं वाचून, या सापळ्यातून बाहेर पडणं शक्य आहे का हा प्रश्न पडू शकतो. या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी केवळ १ गोष्ट आवश्यक असते: ती म्हणजे मनाची तयारी, आणि साथ. काही जण असतात, जे स्वत:च स्वत:चे साथीदार होतात, withdrawal ची परिक्षा ते सहन करुन पास होतात. पण हे अपवाद. बहुतेकांना मदद लागतें. बहुतेकांना आधी हे समजवावं, पटवावं लागतं, की, बाबा, तंबाखू तुझ्या हाता नसून, तू तंबाखूच्या हातात गेलेला आहेस. हे बर्याचदा कळतं, पण वळत नाही. कारण अनेकदा सांगण्याची पद्धत चुकलेली असते. सांगणारा आधारस्तंभाच्या जागी न जाता, उपदेशकाच्या जागी गेलेला असतो. 


वर दिल्याप्रमाणे, सर्वप्रथम मनाची तयारी करण्यासाठी खालील प्रश्न स्वत:ला विचारा: 

१) तुम्ही/तुमच्या जवळची व्यक्ती तंबााखू दररोज वापरते का?

2) तंबाखू वापरता आला नाही, तर शरीराला काही त्रास होतो का, किंवा काही लक्षणे जाणवतात का? (जसे बेचैन होणे,डोके दुखणे इत्यादि)

3) ठरविक वेळ झाली की तंबाखू वापरण्याची तल्लफ लागते का? 

4) दररोज वापरावा लागणार तंबाखू हळूहळू वाढत जात आहे का? 

5) शरीरातील क्रिया किंवा विधी तंबाखू वर अवलंबून झाले आहेत का (जसे झोप येणे, पोट साफ होणे इत्यादि)? 


वरील पैकी कोणतेही 2 प्रश्नांची उत्तरे जर “हो” अशी असतील, तर तंबाखू चं व्यसन लागलं आहे हे म्हणायला हरकत नाही. स्वत: ला किंवा जवळच्या व्यक्तीला या व्यसनातून बाहेर काढायची इच्छा असेल, तर काय कराल?

1. सर्वप्रथम त्या व्यक्तीशी तुमचे सूर जुळलेले असले पाहिजेत. तुम्ही त्याच्या चांगल्यासाठीच बोलताय हा विश्वास त्याचा असला पाहिजे.

2. उपदेश करु नका, बोला. व्यसनाचा संबंध परंपरा, धर्म, संस्कार यांच्याशी जोडून अपराधीपणाची भावना निर्माण करु नका. अपराधीपणा हा कधीच Positive Motivator असू शकत नाही. 

3. केवळ समस्या सांगून सोडून देऊ नका. मार्ग शोधण्यात मदत करा. 

4. ती व्यक्ती गुन्हेगार असल्याच्या अविर्भावात बोलू नका. तुम्ही त्याला/तिला मदत करायच्या हेतूने काम करताय, चुका दाखवण्याच्या नाही हे ध्यानात असू द्या. 

5. योग्य मार्ग धरल्यावर, त्यात अडचणी येणारच. त्यांवर मात करण्यासाठी मदत करा. उदा: तंबाखू सोडल्यावर, ज़र withdrawal येणे, craving होणे या पूर्णत: नैसर्गिक व अपेक्षित अडचणी आहेत. 

6. तुम्हीं मदत करू शकत नसाल, किंवा तुमची मदत अपुरी पडतेय असं वाटत असेल, किंवा काही समस्यांवर तुमच्याकडे उपाय नसेल, तर तज्ञांची मदत घ्या.For Details:

Dhanvantari Nursing Home Neuropsychiatry Centre

331, A/E, Opp Wilder Memorial Church, Near Trade Centre, New Shahupuri, Kolhapur. 416001.

For appointments: 9167577279.


27 views0 comments

Comments


bottom of page